आता आपण एक संत महामानवाच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत ते महान संत महापुरुष आहेत शिवभक्त परमपूज्य गुरुवर्य श्री शंकरराव रंगनाथ सर्जे उर्फ श्री सर्जेमामा परमपूज्य शिवभक्त गुरुवर्य सर्जेमामा यांचा जन्म 6 मार्च 1940 साली श्री क्षेत्र गणपती मोरगाव, तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी एका सामान्य कुटुंबात झाला
लहानपणापासून परमेश्वराची भक्ती करणारे परमपूज्य शिवभक्त गुरुवर्य सर्जेमामा महादेवाच्या पूजन आणि भारावून जायचे बेताच्या कठीण परिस्थितीतून त्यांनी बोर्ड पर्यंतचे शिक्षण प्राप्त केले. परिस्थितीच्या जाणीवेणे मामांनी वनपालाची (फॉरेस्ट ऑफिसर) नोकरी मिळवली. सिंहगड वनक्षेत्रात तेथील वनसंरक्षक या हुद्द्यावर वनसंवर्धनाची जबाबदारी त्यांच्यावर होती नोकरीची जबाबदारी पार पाडत असताना पार पडत असताना दिनांक 6 मार्च 1962 हा दिवस परमपूज्य गुरुवारी सर्जेमामा यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. डावजे वनक्षेत्रात गस्त घालत असताना प्रचंड ऊर्जेचा ध्वनी आकाशवाणी प्रमाणे ऐकू आला.
साक्षात परमेश्वराची ती आकाशवाणी होती, "उठ सावध हो, मला तहान लागली आहे, पाणी पाज"अथक शोधा नंतर जमिनीखालचा ध्वनी असल्याच्या जाणीवेणे मामांनी खोदकाम केले आणि स्वयंभू शिवलिंग व नंदी ची प्राप्ती परम पूज्य शिवभक्त गुरुवर्य सर्जेमामा यांना झाली त्यानंतर सर्जेमामांनी आज आपण पाहत असलेल्या श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थान (देवभूमी) परिसराची निर्मिती केली.
गुरुवर्य सर्जेमामा कोणी योगी नाहीत, संन्यासी नाहीत, मांत्रिक व कोणत्याही प्रकारची अघोरी विद्या संपादन केलेले उपासकही नाहीत तर ते एक शिव उपासक आहेत. तुमच्या आमच्यासारखे प्रापंचिक गृहस्थ अत्यंत साधी राहणी, सरळ स्वभाव कुणाला स्वप्नातही फसवू नये ही वृत्ती. गुरुवर्य सर्
देशभर व्यसनमुक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थान मंदिराची निर्मिती व स्थापना दिनांक 6 मार्च 1962 रोजी परमपूज्य शिवभक्त गुरुवर्य श्री शंकरराव सर्जेमामा यांच्या हस्ते झाली. त्यानंतर सन 1988 मध्ये श्री निळकंठेश्वर धर्मदाय व शैक्षणिक ट्रस्ट(रजि. नं.E/1188 पुणे) ट्रस्टची निर्मिती करण्यात येऊन देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्य परमपूज्य शिवभक्त गुरुवर्य सर्जेमामा यांनी केले.
सन 1962 पासून सुरू झालेले कार्य आजचा गायक अखंड अव्याहत यशस्वीपणे सुरूच आहे डावजे डोंगरावर देवभूमी येथे हिंदू धर्मातील पारंपारिक दृश्य असंख्य मूर्तीच्या स्वरूपात साकारण्यात आले आहे आपल्या समाजाला आपल्या धर्माची संस्कृतिक व ओळख व्हावी म्हणून परमपूज्य सर्जेमामांनी येथे मुर्त्या साकारल्या आहेत आणखीही काही धार्मिक प्रसंग मूर्ती स्वरूपात साकारण्याचे काम मामांच्या पश्चात अजूनही सुरू आहे.
येथे महाशिवरात्री, शिवलिंग प्रकट दिन निमित्त महारुद्र होम हवन यज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह, गुरुपौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, गुरुवर्य सर्जे मामांची जयंती व पुण्यतिथी इत्यादी अनेक कार्यक्रम केले जातात. त्यानिमित्त लाखो भाविक येथे येतात त्यांची राहण्याची व भोजनाची सोय येथे उत्तम व मोफत केली जाते तसेच येथे देशभरातून सर्व राज्यातून भाविक दर्शनासाठी घरगुती समस्या सोडवण्यासाठी व्यसनमुक्तीसाठी येतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे सदर ठिकाण हे शिवभक्तीतून व्यसनमुक्ती करणारे एकमेव ठिकाण म्हणून देशभरात प्रसिद्ध असून येथे विनामूल्य व्यसनमुक्तीचे कार्य सन 1962 सालापासून अविरत सुरू आहे आजतागायत येथे एक कोटी लोकांची यशस्वीपणे व्यसनमुक्ती झाली आहे. गुरुवर्य सर्जेमामांच्या पश्चात धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक
6 मार्च 1962 रोजी परमपूज्य शिवभक्त गुरुवर्य सर्जे मामांना झालेली शिवलिंगाची व नंदिकेश्वराची प्राप्ती हा परमेश्वराचा अद्भुत चमत्कारच आहे साक्षात परमात्म्याचा साक्षात्कार परमपूज्य शिवभक्त गुरुवर्य सर्जेमामांच्या भक्तीचे जणू फळच होते
श्री मामांनी घरी आल्यावर आपल्या साथीदारांना आज डोंगरावर घडलेल्या अद्भुत चमत्काराची संपूर्ण कथा सांगितली सर्व कथा ऐकून त्या सर्वांची खात्री झाली की हा कोणी सामान्य माणूस नक्कीच नाही मानवाच्या रूपाने कुणी भगवंताचा दूतच प्रकट झाला आहे अशी त्यांची मनोमन भावना होऊ लागली त्या सर्वांनीही श्रद्धायुक्त भावनेने श्री मामांच्या पायावर मस्तक ठेवले हळूहळू ही हकीकत सगळीकडे वाऱ्यासारखे पसरू लागली
आजूबाजूचे लोक श्री मामांना भेटण्यासाठी मुद्दाम येऊ लागले येताना आपल्या मनात हजारो प्रश्न घेऊन येऊ लागले आपली गाऱ्हाणे सांगू लागले. "आपणास भगवंताचा दृष्टांत झालाय तुम्ही माझ्याकडे या मी तुमचे दुःख निवारण करतो" असा कोणताही संदेश श्री सर्जेमामांनी कोणालाही दिला नव्हता तरी लोक आपले आपणच येत आणि आपल्या घरगुती व इतर प्रश्नावर तोडगा विचारीत.
अशा परिस्थितीत आपणाकडे आलेल्या भाव इच्छुकाला रिकाम्या हाताने परत कसे पाठवायचे मनात आशा घेऊन आलेल्यांनी विन्मुख जाऊ नये म्हणून श्री मामा त्यांच्या हातावर एक भस्म प्रभावाची पुडी, चिमूटभर साखर प्रसाद म्हणून ठेवीत "भगवान महादेवाची सेवा करा, ओम नमः शिवाय जप करा, तो तुमचे सारे प्रश्न सोडविल"असा उपदेश करून त्यांना निरोप देत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे जे भस्म प्रभाव घेऊन गेले होते त्यांचे अनेक प्रश्न आपोआप सुटू लागले व आपणास आलेला अनुभव ते एकमेकास सांगू लागले अशा प्रकारे लोकांचा श्री मामांच्या प्रभावावर विश्वास बसू लागला
श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर डावजे डोंगरावर देवभूमी येथे हिंदू धर्मातील पारंपारिक दृश्य असंख्य मूर्तीच्या स्वरूपात साकारण्यात आले आहे. आपल्या समाजाला व आपल्या नवीन पिढीला आपल्या धर्माची संस्कृतीक माहिती व ओळख व्हावी म्हणून परमपूज्य गुरुवर्य सर्जेमामांनी येथे मुर्त्या साकारल्या आहेत.
आणखीही काही संस्कृतिक धार्मिक प्रसंग मुर्त्यांच्या स्वरूपात साकारण्याचे काम मामांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र आदरणीय शिवभक्त गुरुवर्य शिवदास भाऊ सर्जे यांनी आदरणीय गुरुमाता सर्जेमामी यांचे मार्गदर्शनाखाली अजूनही सुरूच ठेवले आहे.
तसेच प्रत्येक मूर्तीच्या सेटजवळ त्या मूर्तीची/ सेटची प्रसंगाची संपूर्ण माहिती असलेले बोर्ड लावण्यात आलेले आहे. मुर्त्यांच्या सेटची माहिती पुढील प्रमाणे:- भीम जरासंद युद्ध तीन मूर्ती , हत्ती व कृष्णा युद्ध पाच मूर्ती, शुर्पणका नाक कापताना चार मूर्ती दुर्योधन भीम युद्ध चार मूर्ती गोकुळ पाच मूर्ती निळकंठेश्वर गडावरील गाढव सहा मूर्ती संत एकनाथ महाराज दोन मूर्ती शंकर पिंड विष्णू तीन मूर्ती भीष्म बाण शय्येवरवर चार मूर्ती चिल्या बाळ दोन मूर्ती बालक दत्ता अवतार पाच मूर्ती त्राटिका राक्षस चार मूर्ती कुंभकर्ण 40 मूर्ती भीम बकासुर युद्ध चारमूर्ती इंद्र दरबार 18 मूर्ती अमृतवाटप अकरा मूर्ती समुद्रमंथन मोठा शंकर 28 मूर्ती बाली सुग्रीव युद्ध 15 मूर्ती महानंदा शंकर तीन मूर्ती महानंदा कुक्कुट मर्कट चार मूर्ती काली माता दोन मूर्ती भरत सती सावित्री चार मूर्ती लक्ष्मीनारायण गरुड तीन मूर्ती एक मुखी दत्त सहा मूर्ती मच्छिंद्रनाथ व नवनाथ जन्म नाव मूर्ती मच्छिंद्रनाथ दीक्षा देताना तीन मूर्ती गोरक्ष जन्म तीन मूर्ती गोरक्ष परीक्षा तीन मूर्ती गणीनाथ
गुरुवर्य सर्जे मामांचे कार्य आव्हान विरहित आहे दारूबंदी आलेल्या कोणाचेही दारूबंदी जबरदस्तीने केली जात नाही ज्याची इच्छा असेल त्यानेच दारूबंदीची शपथ घ्यावयाची आणि अशा प्रकारे स्व इच्छेने दारूबंदीची शपथ घ्यावयाची अशाप्रकारे स्वच्छने दारूबंदी केलेल्या माणसाची तशी दारू पिण्याची इच्छा होत नाही.
प्रथम दारूबंदीसाठी आलेल्या प्रत्येकाचे नाव पत्ता मोबाईल नंबर नोंदवहीत नोंदवून घेतली जातात त्यानुसार गटागटाणे सामुदायिक शपथविधी केला जातो दारूबंदीचे काम पूर्णतः मोफत केले जाते आवश्यक पूजा साहित्य साठी नाममात्र खर्च येतो तो परस्पर बाहेर ज्याचा त्यानेच करावयाचा असतो दारूबंदी झालेल्या प्रत्येक व्यक्तीस प्रथम सार्वजनिक रित्या विचारले जाते आपुन दारू बंदी करण्यासाठी स्वतःच्या इच्छेने आला आहात का का कोणी जोर जबरदस्तीने आणलं आहे आपली स्वतःची दारू बंद करण्याची इच्छा आहे का ?
आपण सांगितलेले सर्व नियम पाळणार आहात का जेव्हा त्यांचा होकार येतो तेव्हा त्यांना सर्व नियम सविस्तर सांगितले जातात ते पुढील प्रमाणे इथं एक वेळा दारू बंद केली तर ती पूर्ण आयुष्यभरासाठी बंद केली जाते पुन्हा कधीही पिता येणार नाही आणि जर का तुम्ही पुन्हा दारू पिल्यास तुम्हाला प्राय चित्र सजा भोगावे लागेल कारण इथं काही आपल्याकडे दारू बंद करण्यासाठी जादूटोणा जंतरमंतर तंत्र मंत्र असं काही विद्या नाही किंवा कुठले औषध गोळ्या केमिकल्स नाही तरी इथं दैवी शक्ती स्वयंभू निळकंठेश्वराची कृपा व गुरुवर्य सर्जेमामांचा आशीर्वाद देवाची भक्ती शिवभक्तीतून व्यसनमुक्ती या मार्गाने या तत्त्वावर आपली व्यसनमुक्ती केली जाते स्वयंभू निळकंठेश्वर शंकराचे मंदिर स्थान असल्याने भक्ती मार्गातीलच नियम आपणास पाळावे लागतात
श्रीक्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर मंदिर देवभूमी डावजे डोंगर या ठिकाणी संपूर्ण वर्षभरात विविध धार्मिक कार्याचे आयोजन केले जाते यामध्ये महाशिवरात्री उत्सव श्री स्वयंभू शिवलिंग प्रकट वर्धापन दिन महारुद्र होम हवन यज्ञयाग अखंड हरिनाम सप्ताह गुरुपौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा अखंड शिवलीलामृत ग्रंथ पारायण तसेच परमपूज्य शिवभक्त गुरुवर्य सर्जे मामांची जयंती व पुण्यतिथी असे एक ना अनेक कार्यक्रम करण्यात येतात या सर्व कार्यक्रमाची माहिती तारीख व ठिकाण भाविकांना समजावे यासाठी वार्षिक नियोजित उत्सव कार्ड छापून वाटण्यात येतात त्यामुळे भाविकांना कोणत्याही शंका राहत नाहीत
तसेच या सर्व कार्यक्रमाची संपूर्ण माहिती डिजिटल ऑनलाइन द्वारे सुद्धा भक्त गणापर्यंत पोहोचता यावी यासाठी श्रीक्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थान ट्रस्टमार्फत https://www.neelkantheshwarpune.com वेबसाईट तयार करण्यात आले आहे यावर देवस्थान मध्ये होणाऱ्या सर्व धार्मिक सामाजिक कार्याचे फोटो व माहिती देण्यात आली आहे तसेच देवस्थानचा एक ईमेल mailto:nilkantheshwardevsthan@gmail.com असा बनविण्यात आला आहे या ईमेल द्वारे ऑनलाईन सूचना व अभिप्राय मागविले जातात तसेच 9922425912 या नंबरचा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे
या व्हाट्सअप ग्रुप द्वारा भक्तगणांना येथे होत असलेल्या धार्मिक कार्याची व त्यांना येथे येऊन काहीही धार्मिक कार्य करण्याची माहिती दिली जाते तसेच देवस्थान तर्फे एक रजिस्टर ठेवण्यात आले असून त्यामध्ये देवस्थानास येणाऱ्या भक्तांचे नाव पत्ता व संपर्क क्रमांक घेतले जातात व त्यांना नंतर संपर्क करून त्यांच्या सूचना व अभिप्राय घेतले जातात.
परमपूज्य शिवभक्त गुरुवर्य सर्जेमामांनी 35 वर्षांपूर्वी सर्व भक्तगणांना व शिष्यांना कमीत कमी खर्चात उत्तम तीर्थयात्रा दर्शन घडावे यासाठी तीर्थक्षेत्र काही यात्रेची सुरुवात केली आणि यात्रांचे नियोजन केले यामध्ये चार धाम वैष्णवदेवी वाघा बॉर्डर अमृतसर अमरनाथ बारा ज्योतिर्लिंग गंगोत्री यमुनोत्री गंगासागर रामेश्वर कन्याकुमारी या अनेक विविध ठिकाणी धार्मिक सहलींचे नियोजन केले होते सदर तीर्थक्षेत्र यात्रा नियोजना मागे अत्यंत दूरदृष्टी ठेवून गुरुवर्य सर्जेमामांनी सदर तीर्थयात्रा ची सुरुवात केली होती.
भारत देश हा अत्यंत विविधतेने नटलेला एक देश आहे आपला हा देश धार्मिक सांस्कृतिक कलागुणांनी एकवटलेला आहे .सर्व धर्म समभाव या भावनेतून परमपूज्य गुरुवर्य सर्जेमामांनी सर्व धार्मिक स्थळांचे दर्शन घडावे त्याचबरोबर तेथील निसर्ग, पर्यावरण, व तेथील लोकांचे सामाजिक जीवनमान व राहणीमान, तसेच मंदिराची जडणघडण ,व्यवस्थापन इ.ची माहिती पण व्हावी व कमी खर्चात तीर्थयात्रा पण घडावी या दुहेरी दृष्टिकोनातून सुरू केलेली तीर्थयात्रेने परम पूज्य गुरुवर्यसर्जेमामांच्या पश्चात आता परमपूज्य गुरुमाता सर्जेमामी व परमपूज्य गुरुवर्य शिवभक्त श्री शिवदाभाऊ उर्फ बाळासाहेब शंकरराव सर्जे यांचे मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूप प्राप्त केले आहे.
परम पूज्य शिवभक्त गुरुवर्य श्री सर्जेमामा यांनी आपल्या समवेत शिष्य व भक्तगणांना कमी खर्चात तीर्थक्षेत्र काशीयात्रासह भारतामध्ये विविध तीर्थक्षेत्रांची यात्रा घडवून आणली त्यांची ही परंपरा आदरणीय शिवभक्त गुरुवर्य श्री शिवदास भाऊ उर्फ बाळासाहेब सर्जे यांनी चालू ठेवले आहे. परंतु भक्तगणांच्या मागणीनुसार यात्रा फक्त काशी तीर्थक्षेत्रापूर्ती मर्यादित नसावी
गेल्या पाच दशकापासून श्री निळकंठेश्वर धर्मादाय व शैक्षणिक ट्रस्ट (रजि. नं.E/1188) च्या माध्यमातून धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रम करून त्यावर खर्च केला जातो. धार्मिक कार्यक्रमाचे म्हणाल तर जुलैमध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली जाते नोव्हेंबरमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा तसेच अखंड शिवलीलामृत ग्रंथ पारायण केले जाते. शिवलिंग प्रकट दिन वर्धापन दिन निमित्ताने महारुद्र यज्ञ केला जातो.
महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो तसेच अखंड हरिनाम सप्ताह उत्सव देखील केला जातो या धार्मिक कार्यक्रमांच्या वेळेस भजन कीर्तन प्रवचने भारुड इत्यादी कार्यक्रम केले जातात तसेच अनेक आरोग्य शिबिरे मोठ्या प्रमाणात भरवले जातात या कार्यक्रमाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात मोफत अन्नदान सुद्धा केले जाते या सर्व कार्यक्रमाचे नियोजन व खर्च ट्रस्ट मार्फत केले जाते
तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक स्पर्धा भरून त्यांना बक्षीस वितरण केले जाते विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते तसेच शाळांना आवश्यक सर्व साहित्य वितरित केले जाते तसेच आरोग्यदायक शिबिरे भरून सामाजिक कार्य पण केले जाते हा सर्व खर्च व नियोजन ट्रस्टमार्फत केला जातो.